News Flash

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली, किडनी फक्त २५ टक्के कार्यरत

मागील काही दिवसांमध्ये किडनीच्या कार्यक्षमतेमध्ये १० टक्के घट झाल्याचं पाहायला मिळाले

संग्रहीत छायाचित्र

बिहारमध्ये सध्या निवडणुकीचं वारं शांत झालं आहे. दोन दिवसांमध्ये बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल हे स्पष्ट होईल. नितीश कुमार, तेजस्वी यादव, सुशील मोदी आणि चिराग पासवान यांनी आपल्या पक्षासाठी सर्वस्व पणाला लावलं आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वच स्तरातून एक्झिट पोल येत आहेत. एकीकडे बिहारचं राजकाण ढवळून निघालं असतानाच दुसरीकडे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे.

रांची येथील रिम्स रुग्णालयात लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरु आहेत. शनिवारी लालू प्रसाद यादव यांच्या जामीनावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर केला नाही. त्यानंतर लालू प्रसाद यादव मानसिक तणावात गेले आहेत. तसेच मधुमेहाचा आजार असल्याने लालूंच्या क्रियेटनीन पातळीत अचानक वाढ झाली आहे.

रिम्समध्ये लालूंवर उपचार करत असलेल्या डॉ. उमेश प्रसाद यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार क्रियेटनीन पातळी अशीच वाढली तर लालूप्रसाद यादव यांना डायलिसिस करण्याची आवश्यकता भासू शकते. याबाबतची माहिती हायकोर्टाला देण्यात आली आहे. हायकोर्टाने रिम्स प्रशासनाकडून लालू प्रसाद यादव यांच्या आरोग्याबाबत अहवाल मागवला होता.

लालू प्रसाद यादव जेव्हा रिम्समध्ये उपचारासाठी दाखल झाले होते तेव्हा त्यांची किडनी ३ बी स्टेजला होती. सध्या ती ४बी स्टेजला पोहचली आहे. सध्या लालू यांची किडनी फक्त २५ टक्के काम करत आहे. मागील काही दिवसांमध्ये त्यांच्या किडनीच्या कार्यक्षमतेमध्ये १० टक्के घट झाल्याचं पाहायला मिळाले. यामध्ये आणखी घट झाल्यास त्यांना तातडीनं डायलिसीस करण्याची आवश्यकता भासू शकते, असं रिम्समध्यील तज्ज्ञांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2020 9:26 am

Web Title: rjd chief lalu prasad yadav health deteriorates may have to go for dialysis if situation does not improve nck 90
टॅग : Lalu Prasad Yadav
Next Stories
1 जो बायडन यांचं ट्रम्प समर्थकांना आवाहन, म्हणाले……
2 १ जानेवारी २०२१ पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ बंधनकारक
3 अमिरातीमध्ये मुस्लीम वैयक्तिक कायदे शिथिल
Just Now!
X