News Flash

काबूलमधील राजप्रासादावर अग्निबाण हल्ले

तालिबानवर कडवट शब्दात टीका केली आहे.

काबूल : अफगाणिस्तानात तालिबानने काबूल येथील राजप्रासादावर हल्ले केले असून इद अल अधाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष अशरफ घनी यांचे देशाला उद्देशून भाषण होण्याच्या आधीच हे हल्ले करण्यात आले. एकूण तीन अग्निबाण काबूलमधील राजप्रासादावर मंगळवारी डागण्यात आले. त्याचा घनी यांनी निषेध केला असून तालिबानवर कडवट शब्दात टीका केली आहे.

अंतर्गत सुरक्षामंत्री मिरवैझ स्टॅनीकाझी यांनी सांगितले की, अग्निबाण हल्ल्यात कुणीही जखमी झाले नसून हे अग्निबाण अतिसुरक्षित राजप्रासादांच्या परिसरात पडले आहेत. अजून कुणीही या हल्ल्यांची जबाबदारी घेतली नसली, तरी  बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जवळच्या रस्त्यावरील  एका मोटारीचे नुकसान झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 1:18 am

Web Title: rocket attacks in kabul akp 94
Next Stories
1 धर्मापेक्षा सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचे
2 अ‍ॅमेझॉनवीराची अवकाशवारी
3 केरळ सरकारला कारवाईचा इशारा
Just Now!
X