मागील दीड वर्षात ७५ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे. त्यातले २२ हजार कोटी रुपये हे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपाने १७ हजार कोटी रुपये जमा करताना मला आनंद होतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सेवा सुविधांसाठीच्या आर्थिक तरतुदींची घोषणा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी पीएम-किसान योजने अंतर्गत विविध घोषणा केल्या.

 

Rs 17,000 crores of PM-Kisan Samman Nidhi have been deposited into bank accounts of 8.5 crore farmers with a single click. No middlemen or commission, it went straight to farmers. I am satisfied because the objective of the scheme is being fulfilled: Prime Minister Narendra Modi https://t.co/jFwTxAAi0S pic.twitter.com/s0depFZ24i

शेतकरी समित्या, FPOs यांना गोदामं तयार करण्यासाठी, कोल्ड स्टोअरेज उभारण्यासाठी, फूड प्रोसेसिंग उद्योगांसाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याआधी e-NAM द्वारे एक उत्कृष्ट व्यवस्था तयार करण्यात आली आहे. आता कायदा तयार करून शेतकऱ्याला बाजाराच्या वर्तुळातून आणि बाजाराला कराच्या वर्तुळातून मुक्त केलं जाईल. या निर्णयामुळे शेतकरी त्याच्या शेतात येणाऱ्या उत्पादनांचा थेट सौदा करु शकतो. एवढंच नाही तर सरळ गोदामं, e-NAM शी जोडल्या गेलेल्या संस्था, व्यापारी जे त्याला जास्त किंमत देतील त्यांच्याशी पिकाचा सौदा करु शकतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.