22 October 2020

News Flash

संघ, भाजप नेत्यांना पंतप्रधानांची मेजवानी

संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी या वेळी उपस्थित होते.

पंतप्रदान नरेंद्र मोदी, संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री निवासस्थानी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी या वेळी उपस्थित होते.

हरयाणातील सूरजकुंड येथे भाजप आणि संघाच्या  ६० पदाधिकाऱ्यांची तीन दिवसीय समन्वय बैठक होणार आहे.  त्यात भविष्यातील रणनीती आणि विविध समविचारी संघटनांमध्ये समन्वय कसा वाढवता येईल याची  चर्चा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भोजनासाठी निमंत्रित केल्याचे संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. गुरुवारी सुरू झालेल्या या बैठकीला भाजपचे संघटन मंत्री,  संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, त्याचप्रमाणे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आणि कृष्णा गोपाळ उपस्थित होते.  या वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्व आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 2:31 am

Web Title: rss bjp narendra modi
Next Stories
1 केजरीवाल यांचा ‘ठिय्या’ कायम
2 व्यापार मतभेद मिटवण्यास अमेरिका तयार
3 चिनी वस्तूंवर ५० अब्ज डॉलर्सचा कर लादण्याची ट्रम्प यांची घोषणा
Just Now!
X