27 September 2020

News Flash

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दहशतवादाचे प्रतीक-काँग्रेस आमदार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धार्मिक तेढ वाढवणे पसंत आहे असाही आरोप काँग्रेस आमदाराने केला आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे दहशतवादाचे प्रतीक असलेली संघटना आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार सुंदरलाल तिवारी यांनी केला आहे. सुंदरलाल तिवारी हे मध्यप्रदेशातील रेवा या ठिकाणचे आमदार आहेत त्यांनी आज संघावर कडाडून टीका केली आहे. एवढंच नाही तर आरएसएस ही अशी संघटना आहे जिने महात्मा गांधींना ठार केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशात द्वेष पसरवण्याचे काम होते आहे. धार्मिक तेढ कशी निर्माण होईल दोन धर्मांमधला बंधुभाव कसा संपेल यावर ते लक्ष केंद्रीत करत आहेत असाही गंभीर आरोप सुंदरलाल तिवारी यांनी केला आहे.

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची भाषा केली. ज्यानंतर आता काँग्रेसमधले इतर नेतेही टीका करताना दिसत आहे. मात्र मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी थेट राहुल गांधींनाच आव्हान देत तुमचे पणजोबा आणि आजी हेदेखील संघावर बंदी आणू पाहात होते मात्र त्यांना ते शक्य झालं नाही असं म्हटलं आहे. या सगळ्या वातावरणात काँग्रेस आमदार सुंदरलाल तिवारी यांनी संघावर कडाडून टीकास्त्र सोडलं आहे. या संघटनेने देशाचं काहीही भलं केलेलं नाही. या संघटनेला फक्त धार्मिक तेढ पसरवण्यात रस आहे असाही आरोप त्यांनी केला आहे. आता तिवारी यांनी केलेल्या या वक्तव्यावरून त्यांना भाजपा किंवा संघाच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 2:44 pm

Web Title: rss is the symbol of terrorism says congress mla sunderlal tiwari
Next Stories
1 नॅशनल हेराल्ड प्रकरण: सोनिया, राहुल गांधींच्या आयकर नोटिशीची वैधता तपासण्यास सुप्रीम कोर्ट तयार
2 निवृत्ती फंडातील वाटा न दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या
3 Rafale Deal: राहुल गांधी म्हणतात, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…
Just Now!
X