News Flash

१० ऑगस्टपर्यंत करोनाची लस उपलब्ध होणार, रशियाचा दावा

रशियातून आली चांगली बातमी

जगभरात करोनाचा कहर सुरु असताना रशियातून एक चांगली बातमी समोर आली आहे. १० ऑगस्टपर्यंत करोनावरच्या पहिल्या लसीला मंजुरी देऊ शकतो असा दावा रशियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये रशिया करोना व्हायरसवरची लस बाजारात आणू शकतं. रशियन अधिकारी आणि वैज्ञानिकांनी CNN शी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. मॉस्कोतल्या गामालेया इन्सिट्युटमध्ये ही लस तयार करण्यात आली आहे. गामालेया इन्सिट्युटचा वैज्ञानिकांचा दावा आहे की, सामान्य लोकांच्या वापरासाठी या लसीला १० ऑगस्टपर्यंत मंजुरी देऊ शकतो. पण सर्वात आधी लस फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल असंही रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

रशियाच्या सोवरन वेल्थ फंडचे किरील मित्रिव म्हणाले, ही ऐतिहासिक घटना आहे. ज्याप्रकारणे आम्ही अंतराळात उपग्रह स्फूटनिक सोडला होता, ही तशीच घटना आहे. स्फूटनिकबाबत ऐकून अमेरिकेचे लोक चकित झाले होते. त्याप्रकारे ही लस लॉन्च झाल्यानंतर त्यांना आश्चर्याचा बसणार आहे. मात्र रशियाने आत्तापर्यंत लसीच्या चाचणीची कोणतीही माहिती जारी केलेली नाही. यामुळे या लसीच्या प्रभावाबाबत टिप्पणी करता येणार नाही. याशिवाय लस लवकरात लवकर बाजारात येण्यासाठी राजकीय दबाव असल्याची टीका होत आहे. यासोबत या लसीच्या अपूर्ण मानवी चाचणीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

जगभरात करोनाच्या लसींवर चाचणी सुरु आहे. काही देशांमध्ये लसींची चाचणी ही तिसऱ्या टप्प्यात आहे. तर रशियात दुसरा टप्पा अजून शिल्लक आहे. ३ ऑगस्टपर्यंत हा टप्पा पूर्ण करण्याचा संशोधकांचा मानस आहे. यानंतर तिसऱ्या टप्प्याचं परीक्षण सुरु केलं जाईल असंही सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 3:53 pm

Web Title: russia likely to approve corona virus vaccine by 10 august scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक! गव्हाच्या पीठात विष मिसळून न्यायाधीशांची हत्या, महिला आणि मांत्रिकासह सहा जणांना अटक
2 अयोध्या ते अमेरिका… टाइम्स स्वेअरवरील १७ हजार फुटांच्या स्क्रीनवर झळकणार प्रभू रामाची 3D प्रतिमा
3 करोना लसी संदर्भातील ‘त्या’ महत्त्वाच्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन एकच गोष्ट म्हणाले…
Just Now!
X