News Flash

सीरियात रशियाचे विमान बेपत्ता, शोध सुरू

विमान बेपत्ता झाले त्याच परिसरात फ्रान्स आणि इस्रायलचे हवाई दल सीरियात हवाई हल्ले करत होते. विमानाचा शोध सुरू असल्याचे रशियाने म्हटले आहे. 

संग्रहित छायाचित्र

रशियातील सैन्याचे विमान सीरियात बेपत्ता झाले असून विमानात रशियाच्या सैन्यातील १४ सैनिक होते. विमान बेपत्ता झाले त्याच परिसरात फ्रान्स आणि इस्रायलचे हवाई दल सीरियात हवाई हल्ले करत होते. विमानाचा शोध सुरू असल्याचे रशियाने म्हटले आहे.

रशियाच्या सैन्याचे विमान सीरियातील किनारपट्टीजवळ होते. लताकियातील रशियन सैन्याच्या तळावर हे विमान परतत होते. भूमध्य सागरावरुन जात असताना विमानाचा संपर्क तुटला, असे रशियाने म्हटले आहे. विमानात रशियाचे १४ सैनिक होते. इस्रायल आणि फ्रान्सच्या हवाई दलाचे विमान सीरियात हवाई हल्ले करत असून या हल्ल्यांमध्येच हे विमान पाडण्यात आल्याचे सांगितले जाते. इस्रायलला प्रत्युत्तर देताना सीरियाच्या सैन्यानेच चुकून रशियाच्या विमानाला लक्ष्य केले असावे, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

विमान समुद्रात कोसळले असावी, अशी भीती व्यक्त होत असून रशियाने सीरियाच्या मदतीने परिसरात शोधमोहीम सुरु केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 8:31 am

Web Title: russian military aircraft with 14 servicemen vanishes from radar off syria
Next Stories
1 डेटा लिक प्रकरण : सीबीआयचं फेसबुकला पत्र, तपशील मागविले
2 इंधनाचा भडका थांबेना, पेट्रोल – डिझेल महागले
3 कारवाईचे पुरावे संशयास्पद?
Just Now!
X