रशियाचे माजी पंतप्रधान येवगेनी प्रिमाकोव यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी येथे निधन झाले. अमेरिकेकडे जाणारे त्यांचे विमान अ‍ॅटलांटिकवर असताना सर्बियात नाटोच्या बॉम्बहल्ल्यांमुळे वळवण्यात आल्याची घटना १९९९ मध्ये घडली होती.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. ते मुरब्बी नेते, वैज्ञानिक होते. त्यांनी बोरिस येल्तसिन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात म्हणजे १९९८-९९ दरम्यान पंतप्रधानपद भूषवले होते. १७ ऑगस्ट १९९८ मध्ये रशिया दिवाळखोरीत असताना ते पंतप्रधान झाले.