रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या मुलावर त्याच्याच साखरपुडय़ाच्या दिवशी एका कन्नड अभिनेत्रीवर बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपावरून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
सदानंद गौडा यांचे चिरंजीव कार्तिक गौडा यांनी यांनी बलात्कार व फसवणूक केल्याच्या आरोप करत या कन्नड अभिनेत्रीने मागील आठवड्यात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी संबंधित अभिनेत्री व कार्तिक यांना जबाब नोंदविण्यासाठी पाचारण केले होते. भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ व ४२० अन्वये कार्तिकविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. त्यावरून आता कार्तिक यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यामुळे कार्तिक गौडा यांच्या अडचणींत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
आपल्या मुलाला बलात्काराच्या प्रकरणात गोवलंय – सदानंद गौडा
कार्तिक याने गेल्या जून महिन्यात गौडा यांच्या मंगलोर येथील निवासस्थानी आपल्याशी विवाह केला आणि त्यावेळी गौडा यांचा चालकही उपस्थित असल्याचा दावा या अभिनेत्रीने पोलिसांकडे तक्रार दाखल करतेवेळी केला होता. कार्तिक आणि त्यांचे कुटुंबिय श्रीमंत आणि शक्तीशाली असल्यामुळे ते आपल्याशी अन्यायाने वागत आहेत, असाही दावा पत्रकारांसमोर या अत्रिनेत्राने केला, तेव्हा तिला अश्रू आवरले नाहीत. हे सर्वजण धनवान आणि प्रतिष्ठित असल्यामुळे आपल्याशी असे वागतात. तरी जे काही सत्य आहे, ते बाहेर यायलाच हवे, अशी आपली इच्छा आहे, असेही ती म्हणाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2014 रोजी प्रकाशित
सदानंद गौडा यांच्या मुलाविरोधात अटक वॉरंट
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या मुलावर त्याच्याच साखरपुडय़ाच्या दिवशी एका कन्नड अभिनेत्रीवर बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपावरून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
First published on: 04-09-2014 at 03:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadananda gowdas son karthik faces arrest after warrant issued in alleged rape case