मंगळावरील काही पट्टे मोसमानुसार बदलत असतात व ते दऱ्यांच्या प्रदेशात आहेत. या पट्टय़ांनुसार मंगळावर एकेकाळी पाणी होते असे मंगळावरील दऱ्यांच्या नव्या अभ्यासात दिसून आले आहे.

मंगळावरील व्हॅलीज मरीनरीज हा भाग तेथील विषुववृत्तावर आहे. तेथील काही भागात दऱ्या असून काही सुळकेही आहेत.  जमिनीच्या पृष्ठभागावर पट्टेही आहेत. त्यामुळे भूजल थेट पृष्ठभागावर येत असे. मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फ असला तरी तो विषुवृत्तीय भागातील जास्त तापमानामुळे वितळण्याची व पृष्ठभागावर पाण्याचा अंश दिसण्याची शक्यता कमी आहे, कारण तो बर्फ खोल भागात असावा. वातावरणातून क्षार व इतर माध्यमातून ओढलेले पाणी त्या जलखुणांचे स्पष्टीकरण नाही. रिकरिंग स्लोप लिनी (आरएसएल) हा मंगळाच्या पृष्ठभागाचा गुणधर्म २०११ मध्ये शोधला गेला आहे. तेथील आरएसएल हे ग्रह संशोधनातील एक महत्त्वाचा विषय आहे. पाण्याचा त्यातून भक्कम पुरावा मिळू शकतो. आरएसएलचा भाग दऱ्यांमध्ये जास्त भागात पसरलेला दिसतो, असे अ‍ॅरिझोना विद्यापीठाचे मॅथ्यू चोजानस्की यांनी सांगितले. ते भाग गडद काळ्या रेघांसारखे दिसतात व नंतर थंडीच्या दिवसात फिकट पडतात हे चक्र वर्षभर चालते. वैज्ञानिकांच्या मते ४१ आरएसएल खुणा व्हॅलेस मरीनरीज येथे आहेत. नासाच्या मार्स रेकनसान्स ऑर्बिटर यानाने त्याची छायाचित्रे टिपली असून त्यांचा आकार ५.४ बाय १२ किलोमीटर आहे. प्रत्येक ठिकाणी पाणी वाहिल्याच्या १००० रेषा आहेत. अशा खुणा या ग्रहावर जास्त आहेत त्यामुळे तेथे पूर्वी पाणी होते, त्यात भूगर्भशास्त्राचीही उत्सुकता वाढवणारा भाग आहे.

मंगळावर एकेकाळी पाणी होते असे मानले जाते पण ते आताही सापडणे गरजेचे आहे. द्रव किंवा गोठलेले पाणी तेथे मानवी वस्तीस उपयोगी पडू शकते. काही विवरांमध्ये पाण्याचे बर्फ असल्याचे पुरावे मिळाले आहेत. आरएसएल भागांमुळे कमी रेखांशावरील पाण्याचे भाग सापडू शकतात, हे संशोधन जिओफिजिकल रीसर्च-प्लॅनेट्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.