News Flash

रावणाच्या श्रीलंकेत प्रभू रामाच्या भारतापेक्षा पेट्रोल स्वस्त का?; मोदी सरकारने दिलं उत्तर

"प्रभू रामाच्या देशातही पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार का?"

इंधनाच्या वाढत्या दरांवरुन एकीकडे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना संसदेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शेजारी देश नेपाळ आणि श्रीलंकेच्या तुलनेत आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त का आहेत अशी विचारणा समाजवादी पक्षाचे खासदार विश्वंभर प्रसाद निषाद यांनी राज्यसभेत केली आहे. “माता सीतेच्या नेपाळ आणि रावणाच्या श्रीलंकेत पेट्रोल स्वस्त आहे. तर मग आपलं सरकार प्रभू रामाच्या देशातही पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार का?,” असा प्रश्न त्यांनी विचारला.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना भारताच्या तुलनेत कमी लोकसंख्या असणाऱ्या देशांसोबत तुलना करणं अयोग्य असल्याचं म्हटलं. या देशांची लोकसंख्या कमी असल्याने इंधनाचा वापरदेखील कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- समजून घ्या : कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल ६० डॉलरच्या पुढे, भारतावर काय होणार परिणाम ?

“आपण आपली तुलना मोठ्या अर्थव्यवस्थेशी करायची की छोट्या? या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या वस्तू महाग आहेत. या देशांमध्ये केरोसिनचा असणारा दर आणि आपल्या देशातील दर यामध्ये खूप तफावत आहे. बांगलादेश आणि नेपाळमध्ये केरोसिनचा दर प्रतीलिटर ५७ ते ५९ रुपये असून आपल्याकडे ३२ रुपये आहे,” अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

विरोधकांनी इंधनाच्या वाढत्या दराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय किंमतीच्या यंत्रणेने नियंत्रित केले जात असल्याचं सांगितलं.

आणखी वाचा- “जवानही नाही, शेतकरीही नाही… मोदी सरकारसाठी उद्योजक मित्रच देव”

“गेल्या ३०० दिवसांमध्ये जवळपास ६० वेळा इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. आम्ही सात वेळा पेट्रोल आणि २१ वेळा डिझेलचा दर कमी केला आहे. तर २५० दिवस आम्ही दर वाढवला किंवा कमी केलेला नाही. त्यामुळे हा आरोप चुकीचा आहे,” असं त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 2:37 pm

Web Title: samajwadi party mp vishambhar prasad nishad why fuel cheaper sita nepal ravana sri lanka sgy 87
Next Stories
1 नाना पटोले व उदयनराजेंची सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2 मी आंदोलनजीवी अन् त्याचा मला अभिमान – पी. चिदंबरम
3 दुर्दैवी! पाकिस्तानात १८ वर्षे तुरूंगवास भोगल्यानंतर औरंगाबादला परतली, पण १५ दिवसांतच मृत्यूनं गाठलं
Just Now!
X