News Flash

SBI करणार ‘डेबिट कार्ड’ सेवा बंद, पैसे काढण्यासाठी ‘हा’ असेल पर्याय

एसबीआयचे चेअरमन रजनीशकुमार यांनी एका कार्यक्रमात याबाबत सुतोवाच केले आहे.

संग्रहित छायाचित्र

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) येत्या काळात ‘डेबिट कार्ड’ सेवा बंद करण्याच्या योजनेवर काम करीत आहे. त्यामुळे देशात बँकिंग क्षेत्रात पैशांच्या व्यवहारासंदर्भात मोठे बदल होऊ शकतात. मात्र, ‘डेबिट कार्ड’ सेवा बंद केल्यानंतर त्याला पर्याय म्हणून ‘योनो’ या डिजिटल पेमेंट प्रणालीचा वापर वाढवण्यावर एसबीआयचा भर असणार आहे.

एसबीआयचे चेअरमन रजनीशकुमार यांनी एका कार्यक्रमात याबाबत सुतोवाच केले आहे. त्यांनी म्हटले की, “सध्या मोठ्या प्रमाणावर वापरात असलेली डेबिट कार्ड सेवा बंद करण्याची आमची योजना आहे. देशात सध्या ९० कोटी डेबिट कार्ड आणि कोटी क्रेडिट कार्ड वापरात आहेत.”

मात्र, डेबिट कार्डला पर्यायही त्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले, “योनो डिजिटल प्लॅटफॉर्म डेबिट कार्डची सेवा संपुष्टात आणण्यात महत्वाची भुमिका बजावेल. योनोच्या माध्यमातून एटीएम मशिन्समधून रोख रक्कम काढता येईल तसेच दुकानांमधून वस्तू देखील खरेदी करता येतील. बँकेने यापूर्वीच ६८,००० योनो कॅशपॉईंट इन्स्टॉल केले आहेत. त्यानंतर येत्या १८ महिन्यांत याची संख्या १० लखांपर्यंत वाढवण्याची एसबीआयची योजना आहे.

एसबीआयने याच वर्षी ‘योनो’ कॅश सेवेला सुरुवात केली आहे. याद्वारे ग्राहकांना आपल्या अकाऊंटमधून विना डेबिट कार्ड पैसे काढता येतात, ही प्रणाली खूपच सोपी आणि सुरक्षित आहे. सुरुवातीला ही सुविधा १६,५०० एटीएममध्ये उपलब्ध होती, त्यानंतर आता बँक आपल्या सर्व एटीएममध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी काम सुरु असल्याचेही यावेळी रजनीशकुमार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 1:41 pm

Web Title: sbi will close debit card service and would be this option to withdraw money aau 85
Next Stories
1 बालाकोटच्या वेळीच पाकिस्तानात घुसण्यासाठी भारतीय सैन्य होतं तयार
2 “संधी मिळताच अण्वस्त्र वापरून भारताला साफ करून टाकू”; जावेद मियांदादची दर्पोक्ती
3 “बायको लाडूशिवाय दुसरं काही खाऊच देत नाही”, पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव
Just Now!
X