News Flash

देशविरोधी विचाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मिरवता येणार नाही: अमित शहा

देशातील प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे

देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी देश विरोधी विचारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उपमा देता येणार नसल्याचे भाष्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले. कर्नाटकमधील मंगळूरमधील आयोजित तिरंगा यात्रेत अमित शहा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देशविरोधी वक्तव्यावर भाष्य केले. देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र, देश विरोधी विचारांना स्वातंत्र्य देता येणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 4:52 pm

Web Title: sedition being camouflaged as freedom amit shah say about freedom of speech
Next Stories
1 मुंबईतील पाच जणांनी आयसिसमध्ये जाण्यासाठी देश सोडला
2 घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, तिघा दहशतवाद्यांना कंठस्नान
3 नवा पक्ष काढण्याच्या विचारात सिद्धू, असंतुष्टांना देणार प्रवेश
Just Now!
X