तामिळनाडूच्या कुडलोर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घनटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक प्रशासनाच्या मते या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुडलोरचे पोलीस अधीक्षक एम श्री अभिनव यांनी या बाबत माहिती दिली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले असून, स्फोट नेमका कोणत्या कारनाने झाला याचा शोध घेतला जात आहे.
Tamil Nadu: Death toll rises to seven in Cuddalore fire incident, says SP M Sree Abhinav https://t.co/lGY1REwZpl pic.twitter.com/WBgOOJVbbt
— ANI (@ANI) September 4, 2020
कुडलोर जिल्ह्यातील कट्टुमनारकोली भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला असल्याची माहिती मिळाली आहे.