सॅनिटरी नॅपकीन म्हटल्यावर मासिक पाळीदरम्यान महिला वापरत असलेले नॅपकीन येतात. हे नॅपकीन वापरुन झाल्यावर फेकून देण्यात येतात. मात्र या वापरलेल्या नॅपकीनचा उपयोग इंडोनेशियातील तरुण नशा करण्यासाठी करत आहेत. आता या नॅपकीनची नशा म्हणजे काय? तर आपल्याला ऐकूनही किळस वाटेल अशी गोष्ट ही तरुण मंडळी करत आहेत. महिलांनी पाळीदरम्यान वापरलेल्या सॅनिटरी नॅपकीनला उकळत्या पाण्यात टाकले जाते. ते पाणी गार करुन प्यायले जाते. त्यामुळे व्यक्ती बेशुद्ध होते आणि एका वेगळ्याच जगात जाते. यासाठी ही नशा करणारे लोक कचऱ्याच्या डब्यातून वापरलेले सॅनिटरी नॅपकीन शोधून काढतात.

या नशेसाठी पैसे लागत नसल्याने त्याचा वापर केला जातो. १३ ते १६ वयोगटातील ज्या तरुणांकडे पैसे नसतात ते ही नशा करतात. या पॅडमध्ये असणारे घटक उकळल्यानंतर त्यावर प्रक्रिया होते आणि त्यातून काही रसायनांची निर्मिती होते. या सॅनिटरी नॅपकीनच्या पाण्याची चव अतिशय कडू असते मात्र कमी वेळात त्याची नशा चढते. मात्र अशाप्रकारे नशा करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आणि किळसवाणे आहे. इंडोनेशियामध्ये या नशेपासून तरुणांची सुटका करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत विचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.