News Flash

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस

याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार कोश्यारी यांच्यावर ४७ लाख ५७ हजार ७५८ रुपयांची थकबाकी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आदेशानंतरही सुविधांची थकबाकी न दिल्याबद्दल उत्तराखंड उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कारणे  दाखवा नोटीस बजावली आहे आणि चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

विविध सोई सुविधांच्या थकबाकी न भरल्याच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा, माजी मुख्यमंत्री सी.सी. खंडूरी यांच्याविरोधात काढण्यात आलेल्या नोटींसींना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तर केंद्रीय शिक्षणमंत्री आणि माजी मुख्यमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या वीज, पाणी थकबाकीसाठी तसेच ११ लाख रुपये आणि आणखी काही रक्कम जमा न केल्याबद्दल अतिरिक्त सचिव देपेन्द्र चौधरी यांनाही उत्तराखंड उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

रूरल लिटिगेशन अँड एटाइटलमेंट सेंटर (आरएलएसी) यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्र्यांकडे घर व इतर सुविधांबाबतची थकबाकी सहा महिन्यांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले होते. सहा महिन्यानंतरही थकबाकी न भरल्याने आरएलएसीने हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करताना या आदेशाचे पालन का केले नाही आणि या माजी मुख्यमंत्र्यांविरूद्ध अवमान कारवाई का केली जाऊ नये, असा सवाल कोर्टाने सरकारला केला आहे.

कलम ३६१ नुसार आरएलएसीने माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना नोटीस पाठविली होती. कलम ३६१ नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर अवमान याचिका दाखल करण्यापूर्वी दोन महिने आधी माहिती देणे आवश्यक असते. १० ऑक्टोबर रोजी दोन महिने पूर्ण झाल्यानंतर रुलेकने भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार कोश्यारी यांच्यावर ४७ लाख ५७ हजार ७५८ रुपयांची थकबाकी आहे.

बुधवारी न्यायमूर्ती शरद कुमार शर्मा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानुसार कोर्टाने राज्यपाल कोश्यारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 4:02 pm

Web Title: show cause notice to governor bhagat singh koshyari for contempt of court abn 97
Next Stories
1 “माफी मागणार नाही”, राहुल गांधींनी खडसावल्यानंतरही कमलनाथ निर्णयावर ठाम
2 आयटम! कमलनाथ यांच्या वक्तव्यावर राहुल गांधींनी सोडलं मौन; म्हणाले
3 येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोट
Just Now!
X