प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. त्यांना करोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. MGM रुग्णालयाने या संदर्भात एक पत्रक काढून ही माहिती दिली आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. करोना झाल्याने त्यांना ऑगस्ट महिन्यातच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

प्रसिद्ध गायक एस.पी. सुब्रमण्यम यांना करोनाची बाधा ऑगस्ट महिन्यातच झाली आहे. तेव्हापासून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून प्रार्थना केली आहे.

५ ऑगस्ट रोजी एस. पी.बालसुब्रमण्यम यांना करोनाची बाधा झाली. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली होती. आता त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं MGM रुग्णालयाने दिली आहे.