23 September 2020

News Flash

करोनाचा विस्फोट! देशात २४ तासांतील सर्वाधिक रुग्णांची वाढ

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २१ लाखांच्या पुढे

प्रतिनिधिक छायाचित्र

देशातील करोनाबाधित रग्णांच्या संख्येनं २१ लाखांचा टप्पा ओलाडंला आहे. दिवसागणिक वाढत्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. देशात २१ लाख ५३ हजार ११ करोनाबाधित रुग्ण झाले आहे. आरोग्य मंत्रालायनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णसंख्या वाढली आहे. मागील २४ तासांत देशात ६४ हजार ३९९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे करोनाबाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सहा लाख २८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर दुपटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४ लाख ८० हजार ८८५ इतकी आहे. चिंतेची बाब म्हणजे एकूण करोनाबळींची संख्या ४३ हजार ३७९ इतकी आहे.

महाराष्ट्रात एक लाख ४७ हजार ३५५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील ही संख्या सर्वात मोठी आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार ८ ऑगस्ट रोजी सात लाख १८ हजार ३६४ करोना चाचणी घेण्यात आल्या. आतापर्यंत देशात दोन कोटी ४१ लाख करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 11:30 am

Web Title: single day spike of 64399 cases and 861 deaths reported in india in the last 24 hours nck 90
Next Stories
1 पापड खाऊन करोनाशी लढा देण्याचा सल्ला देणारे केंद्रीय मंत्री करोना पॉझिटीव्ह
2 राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय, १०१ संरक्षण उत्पादनांची आयात रोखली
3 दहावीला तिला गणितात मिळाले २ मार्क, रिचेकिंगला दिल्यावर झाले १०० पैकी १००
Just Now!
X