News Flash

“लस दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले…”; नर्सनेच केला खुलासा

मोदींना लस देणाऱ्या नर्स पी. निवेदा यांनी केला खुलासा

(फोटो सौजन्य: डीडी न्यूज आणि मोदींच्या ट्विटर हॅण्डलवरुन साभार)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशामधील तिसऱ्या टप्प्यातील करोना लसीकरण सुरु झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोरनाची लस घेतली. मोदींनी सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील फोटो पोस्ट केल्यानंतर त्याबद्दलची माहिती समोर आली.  या फोटोमध्ये मोदींसोबत दोन नर्सही दिसत आहेत. लस घेताना मोदी हसत असल्याचे या फोटोत दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाला असून मोदींना लस देणाऱ्या दोन्ही नर्सने डीडी न्यूजला मोदींना दिलेल्या लसीसंदर्भातील माहिती दिलीय.

नक्की पाहा >> मोदींच्या लसीकरणाचे फोटो: जाणून घ्या कोणती लस घेतली?, पुढील डोस कधी? अन् लस घेतल्यावर ते काय म्हणाले?

नक्की वाचा >> …म्हणून मोदींनी सकाळी सात वाजताच घेतली लस; जाणून घ्या या लसीकरणाचे ‘इलेक्शन कनेक्शन’

मोदींना लस देणाऱ्या नर्सचे नाव पी. निवेदा असं आहे. निवेदा या मूळच्या पुद्दुचेरीच्या आहेत. “मागील तीन वर्षांपासून मी एम्समध्ये काम करत आहे. सध्या मी करोना लसीकरण केंद्रात कार्यरत आहेत. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणासाठी येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. पीएम सरांना लस देण्यासाठी मला बोलवण्यात आलं तेव्हा ते लस घेण्यासाठी पोहचल्याचं समजलं,” असं निवेदा यांनी सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “सरांना भेटून खूप छान वाटलं. त्यांनी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. त्यांना भारत बायोटेकची कोवॅक्सीन ही लस देण्यात आली असून पुढील डोस २८ दिवसांनंतर देण्यात येणार आहे,” असंही निवेदा यांनी सांगितलं.

मोदींनी काय विचारलं असा प्रश्न या नर्सला विचारण्यात आला. “तुम्ही मुळच्या कुठून आहात वगैरे चौकशी पंतप्रधानांनी केली. तसेच करोनाची लस दिल्यानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया देताना, दिली सुद्धा लस कळलंही नाही, (लगा भी दिये, पता भी नही चला) असं म्हटलं,” अशी माहिती पी. निवेदा यांनी दिली.

तसेच निवेदा यांच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या नर्सचे नाव रोसामा अनिल असं असून त्या केरळच्या आहेत. त्यांनी डीडी न्यूजशी बोलताना आज सकाळीच आम्हाला पंतप्रधान मोदी लस घेण्यासाठी येणार असल्याचं समजल्याची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 10:18 am

Web Title: sister p niveda from puducherry shared experience of vaccinating the pm modi scsg 91
Next Stories
1 सर्वसामान्यांना पुन्हा झटका, चार दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या
2 पुन्हा एकदा चीन अमेरिका संघर्ष?; अमेरिकेच्या एका कृतीमुळे चीनने डागली शेकडो क्षेपणास्त्रं
3 ‘कुठे चूक झाली अल्लाहला विचारेन’; २३ वर्षीय तरुणीची साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या; व्हिडीओमुळे खळबळ
Just Now!
X