संसदेचे कामकाज विरोधकांमुळे ठप्प झाले असल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी शनिवारी फेटाळला. सरकारच संसदेचे कामकाज चालू देत नाही असे सांगून येचुरी यांनी, टूजी घोटाळ्याच्या वेळी जे मापदंड वापरले त्याचे स्मरण भाजपला करून दिले.
संसदेचे कामकाज चालू न देण्यास कोण कारणीभूत असेल तर ते सरकार आहे, टूजी घोटाळ्याच्या वेळी भाजपने संसदेचे हिवाळी अधिवेशन होऊ दिले नव्हते. त्यामुळे सत्तेत असलेला भाजप आता तोच मापदंड का वापरत नाही, असा सवाल येचुरी यांनी केला.