23 January 2021

News Flash

…तर तुम्ही मुस्लिमांना आरक्षण का देत नाहीत?; ओवेसींचा पंतप्रधान मोदींना सवाल

ओवेसी म्हणाले, पंतप्रधान मोदींना शाहबानो प्रकरण लक्षात आहे. मात्र, त्यांना तबरेज अन्सारी, अखलाक, पेहलू खान ही प्रकरणे लक्षात नाहीत.

असदुद्दीन ओवेसी

जर कोणी मुस्लिमांबाबत ‘गटार’वाली टिप्पणी करीत असेल तर तुम्ही काय करीत आहात? तु्म्ही मुस्लिमांना आरक्षण का देत नाहीत? असा सवाल एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदींनी काँग्रेस नेत्याच्या तोंडचे एक वक्तव्य कथन केले होते. त्यावरुन ओवेसींनी मोदींवर निशाणा साधला आहे.


‘मुस्लिमांच्या उद्धाराची जबाबदारी काँग्रेसची नाही जर त्यांना गटारात रहायचे असेल तर राहू द्या’ असे वक्तव्य काँग्रेस नेत्याने केल्याचे मोदींनी काल लोकसभेत सांगितले होते. यावरुन ओवेसी यांनी मोदींवर निशाणा साधला आणि तुम्ही मुस्लिमांसाठी काय केले असा सवाल केला.

ओवेसी म्हणाले, पंतप्रधान मोदींना शाहबानो प्रकरण लक्षात आहे. मात्र, त्यांना तबरेज अन्सारी, अखलाक, पेहलू खान ही प्रकरणे लक्षात नाहीत. मोदी सरकारच्या मंत्र्याने अलमुद्दीन अन्सारीच्या मारेकऱ्याच्या गळ्यात फुलांचा हार घालत सत्कार केला होता. त्यामुळे जर मुस्लिमांबाबत कोणी गटाराबाबतची टिपण्णी करीत असेल तर तुम्ही मुस्लिमांना विशेष काय करीत आहात? त्यांना तुम्ही आरक्षण का लागू करीत नाहीत?

मोदींना उद्देशून बोलताना ओवेसी पुढे म्हणाले, तुमच्या पक्षातून एकही मुस्लिम खासदार का नाही? त्यांना मागे कोणी ठेवलं आहे, यामध्ये तुमचाच हात आहे का? कोणी एखादा शब्द वापरणं आणि त्यांची विचारधारा यामध्ये फरक असतो. माजी पंतप्रधान नरसिंह राव हे बाबरी मशीदीच्या विध्वंसाला जबाबदार आहेत कारण त्यांनी पंतप्रधान म्हणून बाबरी उद्धव होऊ नये यासाठी काहीही केले नाही. आता पंतप्रधान मोदींना त्यांच्या विचारधारेवर काम करायचे आहे. त्यांनी मुस्लिमांसाठी काही तरी करुन दाखवावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 12:23 pm

Web Title: so why do not you give reservation to muslims owaisi questions to pm modi aau 85
Next Stories
1 भाजपा नेत्याच्या मुलाचा भीषण अपघातात मृत्यू, कारचा अक्षरश: चेंदामेंदा
2 ‘मला अध्यक्षपद नकोच!’, राहुल यांची समजूत घालण्याचे UPA चे प्रयत्न अयशस्वी
3 …म्हणून ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यावर आली मुंग्यांची अंडी खाऊन जगण्याची वेळ
Just Now!
X