News Flash

सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा

मला आता कुटुंबियांना वेळ द्यायचा आहे

जून २०१४ मध्ये रंजीतकुमार यांची सॉलिसिटर जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी शुक्रवारी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला. मला आता कुटुंबियांना वेळ द्यायचा आहे, असे रणजीत कुमार यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वीच मुकूल रोहतगी यांनीदेखील अॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ रणजीतकुमार यांनी राजीनामा दिल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

रणजीत कुमार यांना जूनमध्ये केंद्र सरकारने सॉलिसिटर जनरल पदावर एक वर्षासाठी मुदतवाढ दिली होती. जून २०१४ मध्ये रणजीत कुमार यांची सॉलिसिटर जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर तत्कालीन सॉलिसिटर जनरल मोहन परासरन यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर रणजीतकुमार पदावर विराजमान झाले होते.

घटनात्मक कायदे, नागरी सेवा, करसंबंधीच्या कायद्यांविषयीचे जाणकार म्हणून त्यांना ओळखले जाते. यापूर्वी कुमार यांनी गुजरात सरकारसाठी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणात त्यांनी गुजरात सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 3:42 pm

Web Title: solicitor general ranjit kumar resigned from his post citing personal reasons
Next Stories
1 आता मोदींनीच गुजरातचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा : पी. चिदंबरम
2 तामिळनाडूत बस स्टँडचे छत कोसळून ९ ठार
3 Video: अखेर भाजपनं काँग्रेसला ‘विकास’ दाखवला
Just Now!
X