जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी), विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), अणुऊर्जा संस्था (डीएई)  यांच्या प्रयोगशाळांना करोना विषाणू संसर्ग चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. डीबीटी, डीएसटी, सीएसआयआर, डीएई या संस्थांना करोना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आल्याचे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने स्पष्ट केले आहे. सार्स सीओव्ही २ चा विषाणू हा वेगाने पसरत आहे व अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून नमुने हाताळले गेल्यास तो पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रयोगशाळांना निदान संच व इतर घटक पुरवण्यात येणार नाहीत, पण जर राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी शिफारस केली तरच त्यांनी चाचण्या कराव्यात.

या संस्थांची कुठलीही तपासणी आयसीएमआर करणार नाही कारण त्या उच्च मान्यताप्राप्त संस्था आहेत. या संस्थांकडून काही चुका झाल्या तर त्याची जबाबदारी आयसीएमआरवर राहणार नाही.