News Flash

लवकरच प्रसिद्ध सोमनाथ मंदिर सोन्याने लकाकणार

सोन्याने लकाकताना दिसणार

अंबाजी मंदिरानंतर गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरही लवकरच सोन्याने लकाकताना दिसणार आहे. ऐतिहासिक सोमनाथ मंदिरातील ७२ खांबांवर लवकरच सोन्याचे पत्रे चढवण्याची सोमनाथ मंदिर ट्रस्टची योजना आहे. पहिल्या टप्प्यात १० खांबांवर सोन्याचे पत्रे बसवण्यात येतील. मंगळवारी दिल्लीतून काही सोन्याचे पत्रे सोमनाथ मंदिरामध्ये आले आहेत. १० खांबांसाठी एकूण ३० किलो सोने वापरण्यात येईल.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी सोमनाथ मंदिर चर्चेत आले होते. मंदिराचा गाभार, दोन दरवाजे आणि भगवान शंकराचे त्रिशूळ आणि डमरु यांना आधीच सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. नवी दिल्लीतील कलाकारांकडे सोन्याचे पत्रे बनवण्याचे काम देण्यात आले आहे. त्यांनी आधी तांब्यावर डिझाईन तयार केली.

पहिल्या टप्प्यात आम्ही ७२ पैकी १० खांब सोन्याचे करणार आहोत असे मंदिराचे सचिव पी.के.लाहिरी यांनी सांगितले. ट्रस्टने दिल्लीमधून सोन्याची खरेदी केली आहे. जशी सोन्याच्या खांबांसाठी देणगी येत राहिल तशी आम्ही अन्य खांबांचे काम पूर्ण करु असे मंदिराकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 5:54 pm

Web Title: somnath temple to be gold plated
Next Stories
1 ‘पुरुषांप्रमाणे वागणाऱ्या महिला तृतीयपंथी मुलांना जन्म देतात’
2 सलमान, तब्बू, सैफ, सोनाली लटकणार की सटकणार ! उद्या होणार फैसला
3 युआयडीकडून ‘व्हर्च्युअल आयडी’ सुविधेला सुरुवात; आधार क्रमांकाऐवजी वापरता येणार
Just Now!
X