News Flash

फाल्कन ९ अग्निबाणाचा मोठा भाग उपग्रह सोडून पृथ्वीवर परत

स्पेस एक्स कंपनीकडू यशस्वी प्रक्षेपण

| January 16, 2017 01:54 am

स्पेस एक्स कंपनीकडू यशस्वी प्रक्षेपण

स्पेस एक्स कंपनीने त्यांचा फाल्कन ९ अग्निबाण उडवला. नंतर त्याचा पहिल्या टप्प्याचा भाग पृथ्वीवर परतला, त्याचा फेरवापर करता येतो. त्यामुळे अग्निबाणाच्या मदतीने उपग्रह सोडण्याचा खर्च कमी होत असतो. सप्टेंबरमध्ये या कंपनीच्या अग्निबाणाचा स्फोट झाला होता त्यानंतरचे हे पहिलेच यशस्वी उड्डाण आहे. स्पेसएक्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, पांढऱ्या रंगाचा लांबलचक अग्निबाण स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.५४ वाजता अवकाशात झेपावला व त्याने इरिडियम या मोबाईल व डाटा कम्युनिकेशन कंपनीचे दहा उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडले. फाल्कन ९ अग्निबाण अवकाशात झेपावल्यानंतर त्याचे दोन भाग वेगळे झाले. उपग्रह अवकाशातील कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर त्याचा लांबलचक भाग पृथ्वीवर परत आला. त्यानंतर स्पेस एक्सच्या कॅलिफोर्नियातील प्रक्षेपण नियंत्रण कक्षात एकच जल्लोष झाला. त्याचे व्हिडिओ चित्रणही असून त्यात या अग्निबाणाचा लांबलचक भाग प्रशांत महासागरातील एका सागरी मंचावर सरळ उतरताना दिसत आहे. स्पेस एक्स कंपनीने आतापर्यंत उपग्रह सोडून झाल्यानंतर अग्निबाण जमीन व पाण्यात यशस्वीपणे उतरवले आहेत. त्यांचा फेरवापर करता येत असल्याने खर्च वाचतो. येत्या काही महिन्यांत स्पेसएक्स कंपनी इरिडियमचे ८१ उपग्रह अवकाशात पृथ्वी निकटच्या कक्षेत सोडणार आहे. सप्टेंबरमध्ये स्पेसएक्सच्या अग्निबाणाचा स्फोट होऊन २० कोटी डॉलर्सचा उपग्रह नष्ट झाला होता. हा उपग्रह फेसबुकची सेवा आफ्रिकेत इंटरनेट मार्फत पुरवण्यासाठी सोडला जात होता. ड्रॅगन कार्गो शिप अवकाश स्थानकात मालसामान घेऊन जात असताना जून २०१५ मध्येही एक स्फोट झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 1:54 am

Web Title: spacex is back falcon 9 rocket launches 10 satellites
Next Stories
1 निवडणुका होत असलेल्या राज्यांत मंत्र्यांनी तक्रारींवर सुनावणी टाळावी
2 संशोधनातील उत्कृष्टतेसाठी आणखी प्रयत्नांची गरज
3 प्रलंबित खटल्यांत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
Just Now!
X