“गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ने पर्यटकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं असून अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’पेक्षाही अधिक पर्यटकांना आकर्षित करत आहे. यामुळे, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असलेलं केवडिया हे ठिकाण आंतरराष्ट्रीय दर्जाचं फॅमिली हॉलिडे डेस्टिनेशन बनत चालले आहे”, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शहर पर्यावरणीय आणि स्थानिक वारसा जपत संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आलं आहे. सुरुवातीपासूनच संपूर्ण कुटुंबासाठी हे ठिकाण एक आदर्श पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची पंतप्रधानांची दृष्टी होती”, असं गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव गुप्ता वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना म्हणाले. “शहराचं सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी असून अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही जास्त पर्यटकांना आकर्षित करत आहे “, असंही गुप्ता यांनी सांगितलं.

pakistan stock market returns
शेअर बाजार भांडवल ४५७४ अब्ज डॉलर वि. ३३ अब्ज डॉलर… तरीही पाकिस्तानी शेअर बाजाराकडून सेन्सेक्सपेक्षा जास्त परतावा कसा?
mexico cuts ties with ecuador diplomatic tension between ecuador and mexico after embassy raid
इक्वेडोरचा निषेध पुरेसा आहे?
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल
baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार

आणखी वाचा- ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जगातील सर्वात उंच पुतळयाबद्दल जाणून घ्या दहा गोष्टी

दरम्यान, करोना विषाणूचा संसर्ग येण्याआधी म्हणजे लॉकडाउनपूर्वी दररोज 13,000 पर्यटक स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट द्यायचे, तर गेल्या महिन्यात प्रशासनाने लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता दिल्यानंतर सुमारे 10 हजार पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. राजीव गुप्ता यांनी सांगितले की, सुमारे 3,000 आदिवासी मुला-मुलींनी थेट रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. याशिवाय 10,000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. तर, “इथे असलेल्या चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क, आरोग्य व्हॅन, कॅम्पिंग आणि रिव्हर राफ्टिंगसारख्या अशा विविध आकर्षणाच्या गोष्टींमुळे हे ठिकाण कुटुंबियांसाठी सुट्टीचे एक महत्वाचे केंद्र बनत चालले आहे. घरातील प्रत्येकासाठी इथे काहीना काही आकर्षक आहे”, असं गुजरातच्या पर्यटन सचिव ममता वर्मा यांनी म्हटलं.