देशभरात सध्या गोहत्येच्या संशयावरुन मुस्लिमांना जमावाकडून मारहाणीच्या घटना वारंवार घडत आहेत. या मारहाणींमध्ये अनेकांचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पी़डीपी) एका नेत्याने धमकी वजा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मारहाणीचे हे प्रकार थांबवा अन्यथा दुसरी फाळणी होईल असे मुजफ्फर हुसैन बेग या नेत्याने म्हटले आहे.


बेग म्हणाले, देशात गाय आणि म्हशीच्या नावावरुन होत असलेल्या मुस्लिमांच्या हत्या बंद करा अन्यथा याचे परिणाम चांगले होणार नाहीत. १९४७ मध्ये आगोदरच देशाची एक फाळणी झालेली आहे. अशा शब्दांत बेग यांनी मारहाण करणाऱ्यांना इशारा देतानाच देशाच्या दुसऱ्या फाळणीबाबत सूचक असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.