22 February 2019

News Flash

ट्रम्प यांच्यावर आरोप करणारी पॉर्नस्टार अटकेत

ओहियोमधल्या एका स्ट्रिप क्लबमधून स्टॉर्मी डॅनियलला अटक करण्यात आली आहे.

स्टॉर्मी डॅनियल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप केल्याने प्रकाशझोतात आलेली पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल हिला अटक करण्यात आली आहे. ओहियो येथील स्ट्रिप क्लबमधील तिच्या एका वागणुकीमुळे बेड्या ठोकल्या आहेत. डॅनियलच्या वकिलांनी यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे.

डॅनियलच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ओहियोमधल्या स्ट्रिप क्लबमध्ये एका ग्राहकाला लैंगिक भावनेची हेतू न ठेवता स्पर्श करू दिल्याने तिला अटक करण्यात आली आहे. ही एकप्रकारे थट्टाच असून यामागे राजकीय षडयंत्र असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत याविरोधात आपण लढणार असून लवकरात लवकर तिला जामिन मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत कथित संबंध असल्याच्या आरोपांमुळे डॅनियल बरीच चर्चेत आली होती. याबाबत कुठेच वाच्यता न करण्यासाठी २०१६ मध्ये एक लाख ३० हजार डॉलर्स मिळाल्याचेही तिने म्हटलं होतं. मात्र, ट्रम्प यांनी तिचे सर्व आरोप फेटाळले होते.

 

First Published on July 12, 2018 7:51 pm

Web Title: stormy daniels arrested at a strip club in ohio