News Flash

सुनंदा पुष्कर यांच्यावर विषप्रयोग?

दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता.

| January 23, 2016 01:53 am

सुनंदा पुष्कर संग्रहित छायाचित्र

माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला असल्याचे मत येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एआयआयएमएस) तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने नोंदवले आहे. मृत्यूसमयी सुनंदा यांच्या पोटात अ‍ॅलप्रॅक्स हे द्रव्य सापडल्याचे वैद्यकीय पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे सकृद्दर्शनी स्पष्ट होत होते. त्यावरूनच सुनंदा यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एम्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी तयार केलेल्या अहवालात सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे स्पष्ट केले होते.
सुनंदा यांच्यावर विषप्रयोग झाला असावा असे या अहवालात म्हटले आहे. मात्र, त्यांना विषाचे इंजेक्शन टोचण्यात आले किंवा कसे याबाबत संदिग्धता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:53 am

Web Title: sunanda pushkar died of poisoning
टॅग : Sunanda Pushkar
Next Stories
1 हँगओव्हरमुक्त मद्याची उत्तर कोरियात निर्मिती
2 ‘आईने पुत्र गमावल्याच्या वेदना’
3 दहा साहित्यिक पुरस्कार पुन्हा स्वीकारणार
Just Now!
X