Supreme Court Aadhaar Card Verdict: आधार कार्डच्या वैधतेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने मोबाईल नंबर, बँक खाते, शाळेतील प्रवेश तसेच बोर्डाच्या परीक्षेतील आधार सक्तीबाबतही महत्त्वपूर्ण मत मांडले. सीबीएसई विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी ‘आधार’ची सक्ती करु शकत नाही. तसेच शाळेतील प्रवेशासाठीही ‘आधार’ सक्ती करता येणार नाही. याशिवाय बँक खाते, मोबाईल क्रमांक आधारशी जोडणे बंधनकारक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधारकार्डच्या वैधतेबाबतचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिला. बँकेत खाते उघडणे, पॅन कार्ड काढणे, भ्रमणध्वनी सेवा तसेच शाळांमधील प्रवेश, ‘नीट’ व अन्य परीक्षांसाठीही आधारसक्ती करण्यात आली होती. ‘आधार’मुळे खासगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही असे स्पष्ट करत कोर्टाने मोबाईल, बँक खाते आधारशी जोडणे बंधकारक नसल्याचे नमूद केले. तसेच विद्यापीठाच्या परीक्षा, ‘नीट’  व अन्य परीक्षांसाठीही आधारची सक्ती करता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. घुसखोरांनाही आधार कार्ड देऊ नये, असे कोर्टाने आदेशात म्हटले आहे.

जाणून घ्या कल्याणकारी योजनांमधील आधारसक्तीबाबत काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने

 आधार विधेयकाला राज्यसभेच्या मंजुरीची आवश्यकता नाही!

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निकाल दिला आहे. न्या. ए. के. सिकरी, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. अशोक भूषण यांचाही घटनापीठात समावेश आहे. चार विरुद्ध एक अशा मताने हा निर्णय देण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court aadhaar card verdict board examination mobile phones bank accounts linking
First published on: 26-09-2018 at 11:47 IST