News Flash

सुशांतने मला ड्रग्स घेण्यासाठी बळजबरी केली; रियाचा खुलासा

सुशांतमुळे रियाने केलं ड्रग्सचं सेवन?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशियत आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्स सेवनासह अन्य आरोपांखाली मंगळवारी अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली. त्यापूर्वी झालेल्या चौकशीमध्ये रियाने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसंच या प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावंदेखील समोर आली आहेत. यामध्येच रियाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘सुशांतने मला ड्रग्सचं सेवन करण्यासाठी बळजबरी केली होती’, असं रियाने या चौकशीदरम्यान सांगितलं आहे.

‘न्युज18.कॉम’नुसार, सोमवारी रियाची जवळपास ८ तास चौकशी झाली. या चौकशीमध्ये तिने ड्रग्स खरेदी केली होती. मात्र कधीच त्याचं सेवन केलं नाही असं तिने सांगितलं होतं. मात्र मंगळवारी पुन्हा तिची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी मात्र तिने ड्रग्सचं सेवन करत असल्याचं मान्य केलं. परंतु, ‘सुशांतने बळजबरी केल्यामुळे मला ड्रग्स घ्यावे लागले’,असंही ती म्हणाली.

वाचा :  “देव आमच्या सोबत आहे”; रियाच्या अटकेनंतर सुशांतच्या बहिणीचं ट्विट

“मी अनेक वेळा ड्रग्स घेण्यास नकार दिला होता. मात्र सुशांतने बळजबरी केली होती. त्यामुळे काही वेळा गांजाचं सेवन केलं होतं”, असं रियाने सांगितलं.

वाचा : मुंबईत येण्यापूर्वी कंगनाला आणखी एक दणका; सिनेमॅटोग्राफरने चित्रपट करण्यास दिला नकार

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास सुरु असताना ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज रियाला अटक करण्यात आलं. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 10:07 am

Web Title: sushant singh rajput death case rhea chakraborty confession sushant forced me to take drugs ssj 93
Next Stories
1 …आणि दिल्ली पोलिसांनी ट्विट केला Jolly LLB मधला डायलॉग
2 कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होतील का?; ट्रम्प म्हणाले…
3 श्रीलंका : मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या व्यक्तीने घेतली खासदारकीची शपथ
Just Now!
X