25 February 2021

News Flash

सुशांत सिंह राजपूतकडे काम केलेल्या मॅनेजरनं १४व्या मजल्यावरून मारली उडी

पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत..

लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या माजी मॅनेजर दिशा सालियाने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरुन उडी मारली आहे. त्यानंतर तिला बोरीवलीमधील रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

दिशाने मालाड येथील इमारतीच्या १४व्या मजल्यावरुन उडी मारली. त्यावेळी तिच्यासोबत तिच्या जवळचा मित्र तेथे उपस्थित असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहे.

दिशा ही पहिले सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. पण ती आता फुकरे चित्रपटातील अभिनेता वरुण शर्मासाठी काम करत होती. तिने आजवर अनेक सेलिब्रिटींसाठी काम केले आहे. या सेलिब्रिटींमध्ये भारती सिंह आणि ऐश्वर्या राय बच्चनचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 6:34 pm

Web Title: sushant singh rajputs ex manager disha salian jump form 14th floor avb 95
Next Stories
1 “या तथाकथित व्हर्च्युअल रॅली करोनाचा प्रसार नियंत्रित करणार का?, गमावलेला रोजगार परत आणणार का?”
2 …तर दिल्लीत जुलै महिन्याच्या अखेरीस करोनाचे साडे पाच लाखांहून अधिक रुग्ण असतील
3 जी म्हणजे जिनिअस: लॉकडानमध्येही पारलेची जबरदस्त कमाई, मोडला ८२ वर्षांचा रेकॉर्ड
Just Now!
X