20 September 2020

News Flash

सुषमा स्वराज पाकला सडेतोड उत्तर देणार!

संयुक्त राष्ट्र आमसभेत भाषण देण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल

| September 26, 2016 01:47 am

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कला पोहोचल्या असून त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

संयुक्त राष्ट्र आमसभेत भाषण देण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल

संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ७१ व्या सत्राला संबोधित करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कला पोहोचल्या असून, सर्वाच्या नजरा स्वराज यांच्या आजच्या भाषणाकडे लागल्या आहेत. आपल्या भाषणामध्ये त्या पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडून काश्मीरबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांना सडेतोड उत्तर देण्याची शक्यता आहे.

सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्राच्या महासभेला आज दुपारी संबोधित करणार आहेत. त्या न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्या असल्याचे ट्वीट परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी केले आहे.

शरीफ यांनी महासभेत काश्मीरचे तुणतुणे वाजवले होते. त्यामुळे सुषमा स्वराज शरीफ यांना कडक भाषेत उत्तर देणार असल्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. शरीफ यांनी काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भारताने पाकला दहशतवादी देश, दहशतवाद्यांना समर्थन करणार देश असे म्हटले आहे.

दहशतवादाची चिंता भारतासह संपूर्ण जगाला आहे. त्यामुळे यावर ठोस उपाय करण्याची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतील सुधारणा, शाश्वत विकास, हवामान बदल, सुरक्षा आणि शांतता या मुद्दय़ांना भारताची प्राथमिकता असल्याचे देशाचे राजदूत सैयद अकबरउद्दीन यांनी म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 1:47 am

Web Title: sushma swaraj arrives in new york for unga address on monday
Next Stories
1 उरी हल्ल्यात हात नसल्याचे पाकचे वक्तव्य अविश्वासार्ह
2 आंध्र, तेलंगण अल्पसंख्याक आयोगाचा तोंडी तलाक पद्धतीला विरोध
3 हनीफ कडावाला खून प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत सुरू
Just Now!
X