09 August 2020

News Flash

अमेरिकेच्या नौदल तळावर गोळीबार; हल्लेखोर ठार

या तळावर १६ हजार लष्करी अधिकारी आणि सात हजारांहून अधिक नागरिक आहेत.

मियामी : फ्लोरिडातील अमेरिकेच्या नौदल तळावर गोळीबार करून एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या हल्लेखोराला ठार करण्यात आल्याचे पोलीस आणि लष्करातील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. ‘एनएएस पेन्साकोला’वर आता हल्लेखोर नसल्याचे एस्कॅम्बिया परगण्याच्या शेरीफ कार्यालयातून ट्वीट करण्यात आले आहे. हल्लेखोर ठार झाल्याचे ट्वीट संदेशात म्हटले आहे. यानंतर पेन्साकोला बंद करण्यात आले आहे. या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तळावर १६ हजार लष्करी अधिकारी आणि सात हजारांहून अधिक नागरिक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 2:33 am

Web Title: suspected shooter at naval air station pensacola killed
Next Stories
1 लोकसभेत खडाजंगी, कामकाज तहकूब
2 उन्नाव बलात्कार पीडितेचा सफदरगंज रुग्णालयात मृत्यू
3 कधीकधी ठोकशाहीने मिळालेला न्याय योग्य आणि स्वागतार्ह – राज ठाकरे
Just Now!
X