स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या निर्णयामुळे निर्माण झालेले असंतोषाचे वादळ शमण्याची चिन्हे नाहीत. तेलगू देसम पक्षाच्या चार खासदारांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात शिंदेंना घेराव घातला. आंध्रच्या विभाजनास विरोध करतानाच तेलंगणच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटात तेलंगणाशी संबंधित सर्व भागधारकांच्या प्रतिनिधींना स्थान मिळावे, अशी मागणीही गृहमंत्र्यांकडे केली. एन. क्रिस्तप्पा, एन. शिव प्रसाद, के. नारायण राव आणि एम. वेणुगोपाळ रेड्डी यांनी शिंदे यांना घेराव घातला.