संपूर्णपणे देशी बनावटीच्या ‘तेजस’ या लढाऊ विमानांचा ताफा शुक्रवारी औपचारिकपणे भारतीय हवाई दलात दाखल झाला. पंधरा वर्षांपूर्वी या विमानाने पहिल्यांदा उड्डाण केले होते. पण त्यानंतर सातत्याने या विमानांचा ताफा भारतीय हवाई दलात दाखल होण्यास उशीर होत होता. अखेर बंगळुरूमध्ये झालेल्या कार्यक्रमात ही विमाने हवाई दलात दाखल झाली. या विमानांमुळे हवाई दलाची ताकद वाढणार असून, त्यामुळे मिग २१ विमानांनाही पर्याय उपलब्ध झाला आहे.
तेजस विमाने २०१७ पासून सीमेवरतीही वापरण्यात येऊ शकतात, अशी माहिती हवाई दलाकडून देण्यात आली. हवेतून हवेत, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा सामना करण्याची या विमानाची ताकद आहे.
हे विमान आकाशात कसे उडते, त्याचे वजन किती हलके आहे याची माहिती देणारा एक व्हिडिओ सोबत जोडला आहे. तो नक्की पाहा.