News Flash

तेजप्रताप ड्रग अ‍ॅडिक्ट, नशेत स्वतःला म्हणतात शंकर; पत्नीचा आरोप

ते भगवान शंकराप्रमाणे आणि राधा-कृष्णासारखा पेहराव करायचे. एकदा तर नशेत त्यांनी राधेसारखी घागरा-चोली घातली होती. कहर म्हणजे चेहऱ्यावर तसा मेकअपही केला होता.

तेजप्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या राय.

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे ज्येष्ठ पुत्र आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांच्यावर पत्नी ऐश्वर्या राय यांनी मादक पदार्थ्यांचा व्यसनी असल्याचा आरोप केला आहे. तसेच नशा केल्यानंतर आपण भगवान शंकराचा अवतार असल्याचा दावाही तेजप्रताप करीत असल्याचे ऐश्वर्या यांनी म्हटले आहे.

ऐश्वर्या आणि तेजप्रताप यांचे घटस्फोटाचे प्रकरण पटनाच्या फॅमिली कोर्टात आहे. यावेळी दाखल केलेल्या अर्जात ऐश्वर्या यांनी आपला पती मादक पदार्थांचा व्यसनी असून त्याने आपला शाररिक, मानसिक आणि भावनिक छळ केल्याचा आरोप केला आहे. घरगुती हिंसाचाराविरुद्ध महिलांचे संरक्षण कायदा, २००५ च्या कलम २६ नुसार आपल्याला या छळापासून संरक्षण मिळावे अशी मागणी ऐश्वर्या यांनी कोर्टाकडे केली आहे.

ऐश्वर्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नानंतर काही दिवसांतच आपल्याला कळले की, तेजप्रताप यादवांना मादक पदार्थांचे व्यसन आहे. तसेच या मादक पदार्थ्यांची नशा केल्यानंतर ते आपण भगवान शंकराचा अवतार असल्याचा दावा करायचे. इतकेच नव्हे ते भगवान शंकराप्रमाणे आणि राधा-कृष्णासारखा पेहराव करायचे. एकदा तर नशा केल्यानंतर तेजप्रताप यांनी राधेसारखी घागरा-चोली देखील घातली होती. कहर म्हणजे चेहऱ्यावर तसा मेकअप करुन डोक्यात विगही घातला होता.

ऐश्वर्या यांनी म्हटले की, या विचित्र प्रकाराबाबत मी माझ्या सासूबाई आणि नंदेशी बोलले होते त्यावर त्यांनी मला खात्री दिली होती की, तेजप्रताप पुन्हा असे कृत्य करणार नाही. त्यावेळी या दोघींनी मला भावनिक आधार दिला मात्र, त्यानंतरही कधीच तेजप्रतापचे वागणे बदलले नाही. ऐश्वर्या यांनी तेजप्रताप यांना मादक पदार्थांचे सेवन आणि विचित्र कपडे घालणे सोडण्याची विनंतीही केली होती. मात्र, त्यावर त्यांनी पत्नीला सांगितले की, “गांजा तर भोले बाबाचा प्रसाद आहे, त्याला कोणी विरोध कसा करु शकतो. तसेच कृष्णच राधा आहे आणि राधाच कृष्ण आहे” असेही ते म्हणाले होते.

तसेच तुझ्या नशिबात केवळ चूल आणि मूल एवढेच असल्याचे तेजप्रतापने अनेकदा आपल्याला बोलून दाखवले होते असेही ऐश्वर्या यांनी आपल्या तक्रार आर्जात म्हटले आहे. यादव कुटुंबाकडून आपल्याला दररोज शारिरीक, मानसिक आणि भावनिक छळ केला जात होता, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्यात पटत नसल्याने लग्नानंतर पाचच महिन्यांत नोव्हेंबर २०१८ मध्ये तेजप्रताप यांनी पटनाच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 4:04 pm

Web Title: tejpratap yadav drug addicts when drunk calls himself an avatar of lord shiva accuses of wife aishwarya aau 85
Next Stories
1 सुषमा स्वराज यांना अखेरचा सलाम करताना पती आणि मुलीचे डोळे पाणावले
2 धावत्या रेल्वेत कैदी महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार
3 सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचा अखेरचा प्रवास सुरु
Just Now!
X