News Flash

काश्मीरमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

दोन दहशतवादी लपल्याचा संशय

प्रातिनिधिक छायाचित्र

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लामध्ये सुरू असलेल्या या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. रात्री तीन वाजल्यापासून बारामुल्लामध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लामधील हरितार तारझो भागात दोन दहशतवादी लपून बसल्याचा संशय लष्कराच्या जवानांना आहे. भारतीय सैन्याकडून लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 7:43 am

Web Title: terrorist killed in encounter with security forces in baramulla district
Next Stories
1 मालकीच्या वादात ‘सायकल’ रुतली!
2 तुर्कस्तानातील हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली
3 बराक ओबामा यांचे अनेक निर्णय ट्रम्प पहिल्याच दिवशी रद्द करण्याची शक्यता
Just Now!
X