News Flash

जम्मू – काश्मीर : ‘सीआरपीएफ’च्या पथकावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

तीन जवान जखमी, एका नागरिकांचाही मृत्यू

जम्मू – काश्मीर : ‘सीआरपीएफ’च्या पथकावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
प्रतिकात्मक छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ)च्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद झाला तर एका नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अन्य तीन जवान जखमी झाले आहेत. यातील दोन जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सीआरपीएफकडून मिळाली आहे.

सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरास जवानांनी घेराव दिला असून, शोधमोहीम सुरू आहे. दहशतवाद्यांनी सापळा रचून पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 8:43 am

Web Title: terrorists fired upon a crpf patrolling party in sopore jammu kashmir msr 87
Next Stories
1 पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराचा सर्वसामान्यांवर प्रभाव पडत नाही – धर्मेंद्र प्रधान
2 मोफत धान्य नोव्हेंबरपर्यंत
3 संभाव्य लसीचा पहिला लाभ करोनायोद्धय़ांना!
Just Now!
X