पियूष गोयल यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाला चालना देणारा ठरला आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आह. शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प क्रांतिकारी ठरला आहे, या अर्थसंकल्पामुळे देशाच्या प्रगतीत मोलाची भर पडेल असंही शाह यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर यांच्यासह प्रत्येक वर्गाला दिलासा देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा शेतकरी आणि कामगार वर्गाला सर्वाधिक होणार आहे.

मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प म्हणजे मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक ठरला आहे. कारण यामध्ये मध्यमवर्गीय नोकरदार, शेतकरी आणि मजूर वर्गांना दिलासा देणारा ठरला आहे. विरोधकांनी मात्र यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. असं असलं तरीही अमित शाह यांनी मात्र या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे.