23 October 2020

News Flash

पत्नीने मागितली कार, पतीने तिची हत्या करून मृतदेहाचे केले १५ तुकडे

पत्नीकडून वारंवार कार घेण्याच्या मागणीला वैतागलेल्या पतीने चिडून तिचा जीवच घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पती तिचा खून करून थांबला नाही तर त्याने पत्नीच्या

प्रतिनिधिक छायाचित्र

पत्नीकडून वारंवार कार घेण्याच्या मागणीला वैतागलेल्या पतीने चिडून तिचा जीवच घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पती तिचा खून करून थांबला नाही तर त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून एका बॅगमध्ये भरले आणि ते नदीत फेकून दिले. ही ह्दयद्रावक घटना कर्नाटकातील होस्पेट येथे घडली. ही घटना नुकताच उघड झाली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी चंद्रहास (वय २७) हा होस्पेट येथे राहतो. त्याने आपल्या २४ वर्षीय पत्नी भारतीला तिच्याकडून वारंवार होत असलेल्या कारच्या मागणीमुळे मारून टाकले. चंद्रहासने अत्यंत क्रूरपणे भारतीच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि चार बॅगमध्ये ते भरून एका नदीत फेकून दिले. चंद्रहासने मागील दोन वर्षांपूर्वी कपड्याचे दुकान सुरू केले होते. याचदरम्यान त्याने भारतीशी प्रेमविवाह केला होता.

दि. १९ फेब्रुवारी २०१८ मध्ये पती-पत्नीमध्ये कार खरेदी करण्यावरून जोराचे भांडण झाले. वाद इतका वाढला की चंद्रहासने आपल्या पत्नीचा गळाच चिरला. घटनेनंतर चंद्रहासने भारतीच्या कुटुंबीयांना अंधारात ठेवले. भारती अचानक गायब झाल्याचे तो सांगत होता. नंतर भारती गायब झाली नसून तिचा खून झाल्याचे समोर आले. पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 1:47 am

Web Title: the wife asked for the car the husband killed her and cut her in 15 pieces
Next Stories
1 ‘सार्वत्रिक आरोग्यछत्रा’खाली अन्नछत्रही हवे..
2 जगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज, ११० लढाऊ विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू
3 ‘हॅकिंग नाही, हार्डवेअरमधील बिघाडामुळे वेबसाईट डाऊन’
Just Now!
X