27 November 2020

News Flash

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रावर अमित शाह म्हणाले…

'तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का?' असा प्रश्न कोश्यारी यांनी विचारला होता.

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र वादग्रस्त ठरलं. या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केलं आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या शब्दांचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करु शकले असते असे अमित शाह म्हणाले.

‘तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का?’ असा प्रश्न कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात विचारला होता. अमित शाह यांनी न्यूज १८ दिलेल्या मुलाखत दिली.

कोश्यारी यांच्या पत्राकडे पक्ष कुठल्या दृष्टीकोनातून पाहतो, असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला. त्यावर अमित शाह म्हणाले की, “मी पत्र वाचले आहे. त्यांनी काही शब्द टाळले असते, तर बर झालं असतं. त्यांनी ते विशेष शब्द टाळायला पाहिजे होते”

काय आहे प्रकरण?
दोन दिवसांपूर्वीच राज्यातील मंदिरं बंद असण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. एकीकडे सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहेत. तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाउनमध्येच ठेवलं आहे. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही अयोध्येलाही गेला होता.

तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनाची अमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती. या पत्राला उद्धव ठाकरे यांनी दिलेलं उत्तरही चांगलंच गाजलं होतं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही मी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसून स्वागत करत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या पत्राला उत्तर दिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 10:20 pm

Web Title: they could avoide those words amit shah on bhagat singh koshyari letter to uddhav thackeray dmp 82
Next Stories
1 अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन नवरात्रीच्या शुभेच्छा देताना म्हणाले…
2 हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद
3 भारतात रशियन लस ‘स्पुटनिक व्ही’ च्या चाचणीचा मार्ग मोकळा
Just Now!
X