ज्योतिरादित्य शिंदे यांची आज घरवापसी झाली अशी प्रतिक्रिया त्यांची आत्या यशोधरा शिंदे यांनी दिली आहे. यशोधरा शिंदे या भाजपा नेत्या आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जनसंघापासून केली होती. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमध्ये कायमच दुर्लक्षित राहिले. त्यामुळे ते भाजपात येत आहेत ही आनंदचीच गोष्ट आहे. मी त्यांचे अभिनंदन करते असंही यशोधरा शिंदे यांनी म्हटलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. ट्विटरवर त्यांनी राजीनामा पोस्ट केला आहे. हा राजीनामा त्यांनी ९ मार्च रोजीच तयार ठेवला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे. त्यांच्या आत्या आणि भाजपा नेत्या यशोधरा शिंदे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमध्ये होते मात्र तिथे त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. दरम्यान ज्योतिरादित्य शिंदे भाजपात प्रवेश करणार की नवा पक्ष स्थापन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.