News Flash

“…आणि याच व्यक्तीला मोदींनी ३० हजार कोंटीचं कंत्राट दिलं,” प्रशांत भूषण यांचं अनिल अंबानींवर ट्विट

युकेमधील न्यायालयात सुनावणीवेळी अनिल अंबानी यांनी दिलेल्या माहितीवरून साधला निशाणा

संग्रहीत

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी सध्या युनायटेड किंगडममधील न्यायालयात चिनी बँकांच्या सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपण एक साधारण आयुष्य जगत असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपल्याकडे असलेले दागिने विकून आपण आपल्या वकिलांची फी भरत असल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. यावरून आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी निशाणा साधला आहे.

“अनिल अंबानी यांनी युकेमधील न्यायालयात, वकिलांची फी भरण्यासाठी पत्नीचे दागिने विकले असून आता आपल्याकडे काहीही नाही, केवळ एक छोटी कार आहे अशी माहिती दिली. ही तीच व्यक्ती आहे ज्यांना मोदींनी ३० हजार कोटींचं राफेलचं ऑफसेट कंत्राट दिलं”.असं प्रशांत भूषण यांनी ट्विट केलं आहे.

“यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीदरम्यान आपण ९.९ कोटी रूपयांच्या सोन्याचे दागिने विकले. आता आपल्याकडे कोणतंही महागडं सामान शिल्लक नाही,” असं अनिल अंबानी यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. दरम्यान, यावेळी न्यायालयानं त्यांना त्यांच्याकडे असलेल्या लग्झरी गाड्यांबद्दलही प्रश्न केला असता, “या सर्व माध्यमांमधून अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्याकडे कधीही रोल्स रॉयस नव्हती. मी सध्या केवळ एकाच गाडीचा वापर करत आहे,” असंही अंबानी म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आणखी वाचा- दागिने विकून भरतोय वकिलांची फी; न्यायालयासमोर अनिल अंबानींचा दावा

२२ मे २०२० रोजी यूके उच्च न्यायालयानं अनिल अंबानींना १२ जून २०२० पर्यंत चीनच्या तीन बँकांचे ७१,६९,१७,६८१ डॉलर्स (जवळपास ५ हजार २८१ कोटी रूपये) कर्जाची रक्कम आणि ५० हजार पौंड्स ( जवळपास ७ कोटी रूपये) कायदेशीर प्रक्रियेच्या खर्चाच्या रकमेपोटी भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १५ जून रोजी इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाच्या नेतृत्वाखाली चिनी बँकांनी अनिल अंबानी यांच्या संपत्तीची माहिती देण्याची मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 1:19 pm

Web Title: this is the guy to whom modi gave the rafale offset contract worth 30000 crores prashant bhushan msr 87
Next Stories
1 प्रियंका भाजपासाठी आव्हान नाही तर काँग्रेससाठी पनौती; भाजपा नेत्याचे वक्तव्य
2 कृष्ण जन्मभूमी; शाही ईदगाह मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका
3 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणाले…
Just Now!
X