25 November 2020

News Flash

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये दहशतवादी हल्ला; तीन नागरिकांचा मृत्यू

काश्मीर गेल्या काही महिन्यांपासून पेटला असून दहशतवादी हल्ले आणि पाकिस्तानी रेंजर्सकडून होणाऱ्या गोळीबारात निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.

संग्रहित छायाचित्र

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या दहशतवादी हल्ल्याची माहिती कळताच सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दहशतवादी हल्ल्यानंतर पळून जाण्यात यशस्वी ठरले. या घटनेबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.


काश्मीर गेल्या काही महिन्यांपासून पेटला असून दहशतवादी हल्ले आणि पाकिस्तानी रेंजर्सकडून होणाऱ्या गोळीबारात निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. दरम्यान, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारतीय जवान सातत्याने शोध मोहिम हाती घेत असून त्यांचे अड्डे उध्वस्त करीत आहेत. मात्र, तरीही दहशतवादी हार मानायला तयार नाहीत.

दरम्यान, सोमवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन कुख्यात कमांडर समीर टायगर आणि आकिब खान यांचा खात्मा केला. या घटनेत एका मेजरसहित दोन जवानही जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 11:15 pm

Web Title: three civilians killed in an attack by terrorists in baramulla
Next Stories
1 JEE Main Result 2018 : पेपर-१ चा निकाल जाहीर; आंध्रचा सुरज भोगी पहिला
2 उमेदवारांच्या छातीवर जात लिहिण्याचा प्रकार देशाच्या छातीत सुरा भोसकणारा; राहुल गांधींचा भाजपा, संघावर वार
3 फेसबुकच नाही तर तुमचं ट्विटरही असुरक्षित, केम्ब्रिज अॅनालिटीकाला विकला डेटा – रिपोर्ट
Just Now!
X