News Flash

‘पीडीपी’ला सोडचिठ्ठी दिलेल्या ‘त्या’ तिन्ही नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

तिरंगा ध्वजाबद्दल मेहबुबा यांनी केलेल्या वक्तव्याबाबतर व्यक्त केली होती नाराजी

संग्रहीत

पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पीडीपीच्या प्रमुख तीन नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. आता या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

जम्मू-काश्मीरच्या स्वतंत्र झेंडय़ासह राज्याचा विशेष दर्जा पुन्हा बहाल करेपर्यंत आपण तिरंगा ध्वज हाती घेणार नाही, या मुफ्ती यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाराज झालेले टी.एस. बाजवा माजी प्रदेश सचिव हसन अली वफा आणि माजी आमदार वेद महाजन यांनी राजीनामा दिला होता.

विशेष म्हणजे या तिघांनी राजीनामा देताना मेहबुबांना दोन पानी पत्र देखील पाठवले होते. ”तुमच्या वक्तव्याने आमच्या देशभक्तीच्या भावनेला धक्का बसला आहे.” असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. आमच्या इच्छेविरोधात अनेक घडामोडी घडून देखील आम्ही पक्षाच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिलो. मात्र आव्हानांवर मात करण्याऐवजी काही घटक पक्षाला चुकीच्या मार्गावर नेत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 5:01 pm

Web Title: three pdp leaders ved mahajan hussain ali waffa and ts bajwa have joined congress msr 87
Next Stories
1 “कमला हॅरिस हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात, मोदींनी त्यांची खुशमस्करी करु नये”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर
2 … म्हणून तरूणांसमोर शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही – मेहबुबा मुफ्ती
3 बायडन कलम ३७०, ३५ अ पुन्हा लागू करण्यास दबाव आणतील; युथ काँग्रेसच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
Just Now!
X