News Flash

श्रीनगरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

दगडफेक करणाऱ्यांना पळवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधारांच्या नळकांड्यांचा वापर

श्रीनगरमधील लावापोरा भागात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या जोरादार चकमकीत, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. मंगळवारी सुरू झालेली ही चकमक आजही सुरूच आहे. जवानांची एक सयुंक्त तुकडी ही कामगिरी राबवत आहे.

दरम्यान, चकमक सुरू असलेल्या ठिकाणी काही स्थानिक तरूणांकडून दगडफेक केली गेली, यावेळी त्यांना पळवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधारांच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला.

मंगळवारी जवानांना दहशतवादी दडून बसलेल्या ठिकाणाची माहिती मिळाली होती. त्यानुसार एका संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, जवानांची चाहूल लागताच एका इमारतीमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला, ज्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिलं गेलं. ज्यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 1:20 pm

Web Title: three terrorists have been neutralised by security forces in lawaypora area of srinagar msr 87
Next Stories
1 नाताळाच्या पार्टीला गेल्याने कट्टरतावादी मुस्लीम युवकांनी मित्रालाच केली बेदम मारहाण
2 लाच म्हणून एक किलो पेढे मागणारा पोलीस अधिकारी निलंबित
3 केजरीवाल सरकारची मोठी घोषणा, आंदोलक शेतकऱ्यांना देणार फ्री Wi-Fi सुविधा
Just Now!
X