News Flash

अबब! तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संपत्ती पाच वर्षात १९८५ टक्क्यांनी वाढली

१ लाखाहून संपत्ती थेट ४१ लाखांवर पोहोचली

संग्रहित (PTI)

तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आणि आमदाराची संपत्ती १९८५ टक्क्यांनी वाढली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ज्योत्स्ना मंडी यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, २०१६ मध्ये त्यांची एकूण संपत्ती १ लाख ९६ हजार ६३३ रुपये इतकी होती. २०२१ मध्ये ही संपत्ती ३९ लाख ४ हजार ५११ ने वाढली असून ४१ लाख १ हजार १४४ वर पोहोचली आहे.

ज्योत्स्ना मंडी बंकुरा जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. २७ मार्चला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढणाऱ्या ३० उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचा एकत्रित सर्व्हे करण्यात आला. यावेळी २०१६ मध्ये पुरुलियामधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढून विजय मिळवणारे आणि सध्या भाजपात प्रवेश करणारे संदीप कुमार मुखर्जी यांची संपत्ती २८८.८६ टक्क्यांनी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे.

संदीप कुमार मुखर्जी यांनी पाच वर्षांपूर्वी आपली एकूण संपत्ती ११ लाख ५७ हजार ९४५ इतकी असल्याचं सांगितलं होतं. ही संपत्ती २०२१ मध्ये ४५ लाख २ हजार ७८२ इतकी झाली आहे. याशिवाय अनेक उमेदवारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेतील २९४ जागांसाठी आठ टप्प्यात निवडणूक होणार आहे. २९ एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 10:28 am

Web Title: tmc mla jyotsna mandi assets grew by 1985 percent in five years sgy 87
Next Stories
1 भारतातील पहिलं Sex Toy Store महिनाभरातच करावं लागलं बंद
2 भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ व्हावेत -ऑस्टिन
3 महाराष्ट्रात नवे गृहमंत्री?
Just Now!
X