जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देऊन अफजल गुरूच्या फाशीला विरोध करण्याचा कार्यक्रम केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले उमर खालीद व अनीरबन भट्टाचार्य यांनी आज जामिनासाठी दिल्ली न्यायालयात अर्ज केला आहे, त्यांच्याआधी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कन्हैय्याकुमारला मात्र याआधी जामीन मिळाला आहे. कन्हैय्याकुमार हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे.

भट्टाचार्य व खालीद यांना २३ फेब्रुवारीला रात्री ते शरण आल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यांनी पतियाळा हाऊस न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत व त्याची सुनावणी उद्या सत्र न्यायालयात होईल.

पोलिसांनी जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणात या दोघांना अटक केली होती. जेएनयूमधील तो वादग्रस्त कार्यक्रम ९ फेब्रुवारीला घेण्यात आला होता. या याचिकेला पोलिसांकडून विरोध होण्याची शक्यता कमी आहे, कारण आता त्यांचा ताबा पोलिसांना नको आहे असे सूचित होत आहे.