25 January 2020

News Flash

जम्मू-काश्मीर : लष्कर-ए- तोयबाचा प्रमुख दहशतवादी आसिफचा खात्मा

बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये झाली चकमक, दोन जवान जखमी, हत्यारांसह दारूगोळा जप्त

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचा प्रमुख दहशतवादी ठार करण्यात आला. जवानांना दहशतवादी या ठिकाणी लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सेनेच्या २२- राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली होती.

जवानांनी दहशतवादी लपलेल्या परिसरास वेढा देऊन शोध मोहीम सुरू केल्यानंतर, दहशतवाद्याकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. जवानांनी दिलेल्या प्रत्त्युत्तरात लष्कर ए तोयबाच्या प्रमुख कमांडर्समधील दहशतवादी आसिफचा खात्मा झाला. यावेळी जवानांनी त्याच्याजवळील हत्यारांसह काही दारूगोळा देखील जप्त केला. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, ठार करण्यात आलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आसिफ ही सोपोर परिसरात अनेक दिवसांपासून सक्रीय होता. मागील महिन्यात या परिसरात घडलेल्या दहशतवादी कारावायांमध्ये त्याचा सहभाग होता. एवढेच नाहीतर त्यांने ठिकठिकाणी पोस्टर लावून काश्मीर खोऱ्यातील लोकांना दुकानं आणि व्यवसाय बंद ठेवण्यासाठी देखील धमकावले होते.

प्राप्त माहितीच्या आधारे जवानांनी बुधवारी सकाळी सोपोर परिसरास वेढा दिल्यानंतर लपून बसलेल्या दहशतवाद्याने जवानांनावर गोळीबार केला व ग्रेनेडही फेकले. यामध्ये दोन जवान जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या सर्व १० जिल्ह्यांमधील परिस्थिती सर्वसामान्य आहे. सर्व शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयं सुरू झालेली आहेत. लेह आणि कारगिलमध्येही परिस्थिती सामान्य आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध नाहीत. टेलिफोन सेवा देखील सुरळीत झाली असल्याची माहिती डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली.

First Published on September 11, 2019 2:46 pm

Web Title: top ranking let terrorist asif neutralised in an encounter in sopore msr 87
Next Stories
1 वाहतूक दंडाची कपात करणाऱ्या गुजरात सरकारवर गडकरी संतापले, म्हणाले…
2 VIDEO: इंधन वाहून नेणाऱ्या ट्रेनचा भीषण अपघात, संपूर्ण शहराचा विजपुरवठा खंडीत
3 ओम आणि गाय शब्द ऐकताच काहींना वाटतं देश १६व्या शतकात -मोदी
Just Now!
X